संजीव वेलणकर

मा.अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. मा. अंजनीबाई मालपेकर यांनी नजीरखाँ व खादिमा, हुसेनखाँ या तीन भावांच्या कडून संगीताचे शिक्षण घेतले. राग `यमन’ हा भेंडीबाजार घराण्याच्या उस्ताद नजीरखाँनी अंजनीबाईंना शिकवलेला पहिला राग. त्याची तालीम साडेतीन वर्ष चालली होती. अंजनीबाईंचा `मध्यम’ स्वर एखाद्या ज्योतीसारखा कसा प्रज्वलित व्हायचा याचं वर्णन खुद्द कुमार गंधर्वांनी करून ठेवलं आहे.

कुमार गंधर्व म्हणत असत, “देवधर मास्तरांच्या सांगण्यावरून अंजनीबाई मला शिकवायला तयार झाल्या. त्यावेळी त्यांचा प्रत्येक सूर चैतन्यानं पुलकित होऊन समोर येई. सुरांचं हे सामर्थ्य मी यापूर्वी कधी बघितलं नव्हतं.” मा.अंजनीबाई मालपेकर ह्याचे शब्दलालित्य, सुंदर सांगीतिक आशय आणि लयीची गंमत यासाठी या घराण्यातील चिजा प्रसिद्ध होते.

त्या बंदिश धृपद अंगाने म्हणत. खानेपुरी, मुखविलास, आलापी, बोल भरणे, खुलाबंद बोल, उचकसमेट, मींड, कणस्वर, लयीच्या अंगाने सुंदर सरगम करणे इ. त्यांचे गानविशेष म्हणता येतील. हेमराज नावाच्या कर्नाटकातील विख्यात वाद्यनिर्मात्यानं संपूर्ण आयुष्यात बारा-तेराच तंबोरे केले. पैकी एक तंबोरा त्यांनी अब्दुल करीम खाँना भेट दिला आणि दुसरा अंजनीबाईंना.

अंजनीबाईंना कोणी भेटायला आलं की यमन रागातील चिज गुणगुणून त्या पाहुण्यांचं स्वागत करीत. भेंडीबाजार घराण्याचा खरा उत्कर्ष साधला तो गानतपस्वीनी अंजनीबाई मालपेकर आणि उस्ताद अमान अली खाँ यांच्या काळात. … मा.अंजनीबाईकडे बेगम अख्तर, नैनादेवी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी संगीताचे धडे घेतले.

विदुषी अंजनीबाई मालपेकर यांनी आपल्या अतीव सुरेल स्वरलगावाने आणि लयीच्या समझदारीतून ही गायकी पेश केली. विदुषी अंजनीबाई यांची आग्रा-परंतु मुलायम गमक असलेल्या अशा-गायकीची दुर्दैवाने कुणीच दखल घेतली नाही.मा.अंजनीबाई मालपेकर यांचे ७ ऑगस्ट १९७४ रोजी निधन झाले. मा.अंजनीबाई मालपेकर यांना आदरांजली.

Leave a Reply

Your email address will not be published.

You May Also Like

भावपूर्ण श्रद्धांजली

काही लोकांचे कर्तृत्व इतके मोठे असते कि एक आक्खा काळ त्यांच्या नावावर…

अप्रृप

सवयी प्रमाणे कलिंगड व्यवस्थित कापून फ्रीज मध्ये ठेवून दरवाजा बंद करताना पदर…

गर्विष्ठ राजकन्या

कलिंग देशाच्या राजाची मुलगी मैनावती फार सुंदर होती. आपल्या सौंदर्याचा तिला फार…

‘ध’चा ‘मा’ घडल्यानंतरच्या कांडात बळी गेलेले नारायणराव पेशव्यांचा आज जन्मदिन

बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांना दोन मुले. थोरला बाजीराव व धाकटा चिमाजी. बाळाजी…