महाराष्ट्राच्या कुशीत हवा शिवरायांचा जन्म नवा
पुन्हा एकदा देशाला एक नवा इतिहास हवा
याच मातीतून पुन्हा गरजेल स्वराज्य हा शब्द नवा
नष्ट होऊन जातील एकदा अनेक जाती//1//
पण टिकून राहतील खूप आपल्या आपल्यातील नाती
मनुष्याने पुन्हा एकदा हक्कासाठी लढायला हवं
पुन्हा एकदा शिवरायांच स्वराज्य घडवायला हवं
कधी संपतील दृष्टांचे राजकारणातील खेळ
याला साथ देत असते कायम जातीयवादीचे मेळ
निघून जाईल जीवनातून ही दुषित हवा//2//
याच स्वराज्यात पुन्हा घेईल मनुष्य शुद्ध श्वास नवा
– मनोज कोळेकर