Mahabharat

महाभारताचा हिंदू धर्माशी सखोल संबंध आहे आणि आधुनिक हिंदूंवर आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरेवर त्याचा प्रचंड प्रभाव आहे. भारतातील बरेच लोक महाभारताला वास्तविक घटित घटनांची एक मालिका समजतात. काही भारतीय या अगम्य महाकाव्यातून घडलेल्या घटनांची इतिहासात नोंद केली आहे. हे महाकाव्य एक ऐतिहासिक लेख समजले जाते. महाभारत हे सत्य आहे की दंतकथा हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिला आहे. आपण याची पाळेमुळे खोदुन काढण्याचा, शोधण्याचा प्रयत्न केला की जाणवते की महाभारत प्राचीन भारतीय इतिहासाला लाभलेली समृद्ध आणि वास्तवदर्शी माहिती आहे. महाभारताच्या सत्यता आणि दंतकथा असण्यावर लिहिलेले लेख वाचल्यास प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे अश्या अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येतील. त्या घटनांचा अभ्यास करत असताना आपल्याला बहुधा मतांची एक बाजू मिळेल अशीही समजेल ज्यालेखी महाभारतातील वास्तव ही वस्तुस्थिती नाही. या चर्चेअंती इतके तर सत्य आपल्याला कळेल की महाभारत हा भारताचा एक समृद्ध आणि ज्ञानाने ओतप्रोत भरलेला भारतीय इतिहास आहे यात शंका नाही.

भगवत गीता हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचे पवित्र पुस्तक आहे, हे महाभारताचाच एक भाग आहे. भगवान कृष्ण यांनी अर्जुनला कुरुक्षेत्राच्यावेळी नैतिक कर्तव्याची पूर्तता करण्यासाठीचे धडे दिले होते त्याचे इत्यंभूत वर्णन त्यात दिले आहे.

ज्यावेळी ऐन कुरुक्षेत्राच्या वेळी अर्जुनाच्या मनात शंकांचं काहुर ऊठलं होतं तेव्हा युद्धामध्ये लढा देण्यासाठी कृष्णाने अर्जुनाला धीर दिला आहे. यामध्ये केवळ अर्जुनाला नव्हे तर समस्त मनुष्यजातीला प्रबोधनात्मक सांगितले आहे. त्यामुळे हा प्रश्न नेहमीच पुढे उभा रहतो की जर महाभारत वास्तविक नाही तर गीता कोणी लिहिली आणि काय हेतू होता?

महाभारत हे महाकाव्य खरे आहे. त्याची सत्यता सूचित करणारे उपलब्ध पुरावे कोणते आहेत?? त्यांचे पहिले विश्लेषण करून मी काही प्रश्नांची उकल होते का हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारत हा खराखुरा इतिहास आहे असा दावा करण्यासाठी काही युक्तिवाद करु इच्छितो.

भारतीयांनी हे कबूल केले पाहिजे की भारतीय पुराणामधील घटनांचे दुवे केवळ विश्वास-आधारित युक्तिवाद नव्हे तर एक शास्त्रशुद्ध तर्काने ठरवले जातात.

सुरुवातीच्या काही ग्रंथांमध्ये तसेच आदिपर्वामध्ये, महाभारताचे काही अध्याय हे भारत-राजवंशाच्या नोंदी विषयीच्या इतर अठरा पुस्तकांपैकी पहिले पुस्तक आहे. यामध्ये भारत राजवंशाचे वंशज कालक्रमानुसार नोंदवले गेले आहेत. राजा मनुपासून सुरू झालेल्या या वंशाबद्दल शिवाय त्याहून अधिक, काही राजे व त्यांच्या राजवंशांचा तपशीलवार उल्लेख यात करण्यात आला आहे.

एखाद्या काल्पनिक कथेसाठी इतके राजे व त्यांचे वंश या सगळ्याची केवळ कल्पनाच करणे हे अकलनीय आहे. केवळ एका कथेसाठी इतकी पात्र लिहिणे जे आजच्या लेखकाला पटत नाही. आजच्या काळात आपण जे.के.रॉलिंगच्या हॅरी पॉटरला जर खरे मानु शकतो तर महाभारतात त्यावेळचे अनेक कालानुरुप दाखले आहेत. त्यावेळच्या राजा महाराजांचे जीवन व आजुबाजुची समकालीन उदाहरणे यांची ही केवळ कल्पना करणे हे असामान्य वाटते. आपण आत्तापर्यंत वाचलेल्या काही काल्पनिक कथांमध्ये कोणत्याही कार्यात्मक कथा बांधणीसाठी फक्त पाच सहाच राजे त्यांचे वंश पुरेसे असतात. तिथे महाभारतात संपुर्ण जगभरातील राजे व त्यांचे वंश याचा उल्लेख आहे.

त्याकाळच्या विविध जागांचा उल्लेख आहे ज्या जागा केवळ भारतात नाही तर भारता बाहेरच्या देशात आहेत. हे देश भारतीय उपखंडाचा एक भाग होते. त्याकाळी ह्या जागा अखंड भारतात होत्या. उदा. गांधारीचा देश गांधार देश म्हणजे साधारण आजचा अफगाणिस्ताना जवळचा प्रभाग.

महाभारताचे आणि कुरुक्षेत्राचे समर्थन करणार्‍या लोकांचा विचार केल्यास आपल्याला असे जाणवते की या सत्यात घडलेल्या ऐतिहासिक घटना आहेत. या काल्पनिक घटना असत्या आणि लेखकाचा हेतू एक कविता किंवा काल्पनिक कथा लिहिण्याचा मनसुबा असता तर लेखकाने त्याचा कुठेतरी उल्लेख केला असता.

कधी वेळ मिळाला तर जरुर महाभाराताचे वाचन करा. महाभारतात उल्लेख केल्याप्रमाणे कालियुगाचे वर्णन अगदी तंतोतंत जुळते. कलीयुगात म्हणजेच आधुनिक काळातील भविष्यातील संस्कृतीबद्दल जे काही भाकीत केले गेले होते ते खरे झाले आहे असे दिसेल. परंतु कृपया लक्षात घ्या की ह्या भविष्यवाण्या नाहीत त्या गीताचा एक भाग आहेत.

हे हजारो वर्षांपूर्वी लिहिले होते…! त्यामुळे हा केवळ कल्पनाविलास नव्हेच…!

काही लोक म्हणतात की हा केवळ कल्पनाविलास असणे शक्य आहे कारण लेखकाच्या कल्पनाशक्तीवर हे अवलंबुन असते.

असे ठरवण्यासाठी बरेच मार्ग आणि त्याकाळची एकंदर परिस्थिती काय होती याचा अभ्यास करायला हवा…!

हरवलेल्या द्वारका शहराचा पुरातत्व पुरावा

गुजरातमधील द्वारका या प्राचीन पाण्यात बुडलेल्या सागरी पुरातत्व शास्त्राने वैदिक शास्त्रातील विधानांच्या समर्थनार्थ आणखी पुरावे शोधून काढले. महाभारत आणि इतर वैदिक साहित्यात वर्णन केल्याप्रमाणे द्वारका येथे संपूर्ण बुडलेले शहर, भगवान कृष्णाचे प्राचीन बंदराचे शहर, त्याच्या भव्य किल्ल्याच्या भिंती, पायर्‍या, जेट्टी समुद्रात सापडले आहेत.

एक गोष्ट अशी की महाभारताचे समर्थन करणारे त्यांच्याद्वारे केलेले हे दावे खर्‍या ऐतिहासिक घटनांचे वर्णन करतात.

महाभारत आणि वास्तविक स्थाने

उत्तर भारतातील पस्तीस पेक्षा जास्त ठिकाणांवर पुरातत्व खात्याला पुरावे मिळाले आहेत. महाभारतात वर्णन केलेल्या प्राचीन शहरांचे काही भग्न अवशेष सापडले आहेत. हे अवशेष महाभारत काळातील शहरे म्हणून त्यांची ओळखले जात आहेत.

या उत्खननामध्ये तांबे, भांडी, लोखंड, सील, सोने व चांदीचे दागिने, टेराकोटाची तबके, रंगकाम आणि नक्षीकाम केलेले राखाडी मातीची भांडी ही सर्व सापडले आहे.  या कलाकृतींचे वैज्ञानिकदृष्ट्या कार्बन डेटिंग म्हणजेच कार्बन कालमापन पद्धतीने भारतीय पुरातन काळच्या आर्यांच्या आक्रमणाच्या वेळेशी संबंधित आहे.

महाभारतात नमूद केलेली सर्व ठिकाणे वास्तविक स्थाने आहेत. अजूनही त्याच नावाने ती शहरे अस्तित्त्वात आहेत.  उदाहरणार्थ, हस्तिनापूर उत्तर प्रदेशात असून, हस्तिनापुरात महाभारताचे पुष्कळ पुरावे आहेत. इंद्रप्रस्थ म्हणजे सध्याची दिल्ली आहे. द्वारका गुजरात किनारपट्टीवर आहे.

कुरूक्षेत्र जिथे महाभारतातील युद्ध खरोखर घडले ते दिल्लीच्या अगदी जवळच्या भागात म्हणजे सध्याच्या हरियाणामध्ये आहे. विशेष म्हणजे हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही. केकया राज्य आजच्या पाकिस्तानात आहे, आजच्या पाकिस्तानमध्ये मद्रा राज्य आहे.  गांधार राज्य आजच्या अफगाणिस्तानात आहे.  कंबोजस राज्य आजच्या इराणमध्ये आहे. परम कंबोजा राज्य आजच्या ताजिकिस्तानमध्ये आहे.

अलीकडेच संशोधकांना गुजरात जवळच्या समुद्राखाली द्वारका शहर सापडले आहे. महाभारतातील शहरे सध्याच्या भारतपुरती मर्यादीत नाहीत कारण महाभारताने भारतीय उपखंडाचा भारत असा उल्लेख केला

Leave a Reply

Your email address will not be published.

You May Also Like

आज भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका, लावण्यवती मा.अंजनीबाई मालपेकर यांची पुण्यतिथी.

संजीव वेलणकर मा.अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. मा. अंजनीबाई मालपेकर…

अप्रृप

सवयी प्रमाणे कलिंगड व्यवस्थित कापून फ्रीज मध्ये ठेवून दरवाजा बंद करताना पदर…

गर्विष्ठ राजकन्या

कलिंग देशाच्या राजाची मुलगी मैनावती फार सुंदर होती. आपल्या सौंदर्याचा तिला फार…