Education

आपले शिक्षण पूर्ण होते, आणि आपण जस जसे नोकरी -धंद्यात स्थिरावत जातो, तेव्हा आपल्याला एक स्पष्ट जाणीव होऊ लागते कि, आपलं शिक्षण अपुरं आहे. अनुभव हाच खरा गुरू हे पटू लागते. अनुभवाने आपण शहाणे होत जातो and I think that is ever lasting learning process. अर्थ हाच कि जीवनाच्या शाळेत आपण कायमचेच विद्यार्थी असतो. त्यामुळे सतत शिकत रहावे लागते, आणि त्या शिवाय पर्याय नाही. कारण The moment you stop learning, you become obsolete. असं कोणीतरी म्हटल्याचं आठवलं. विद्यार्थी दशेत आपण असतो, तेव्हा एक ठराविक अभ्यासक्रम असतो. तो आपल्याला शिकवला जातो आणि मग परीक्षा होते. पंरतु नोकरी-धंद्यात शिरतो, तेव्हा लक्षांत येते कि, जीवनाच्या शाळेत पावलो-पावली परीक्षा असते. त्यातून अभ्यासक्रमाची ओळख होत जाते. हा अभ्यासक्रम दिवसेंदिवस वाढत जातो. तो विविधांगी होत जातो. आता मी या घटकेला हा लेख लिहीत बसलो आहे, बघा, माझी येथेच चूक झाली. अगदी अचूक सांगायचं तर मी हा लेख सेलफोनवरील सॅमसंग नोट्सवर “टाईप” करीत आहे. मला ही ठाऊक नव्हते कि मी कधीकाळी अशाप्रकारची लिखाणाची पद्धत आत्मसात करीन. शेवटी काय, काल

मला ही ठाऊक नव्हते कि मी कधीकाळी अशाप्रकारची लिखाणाची पद्धत आत्मसात करीन. शेवटी काय, कालय तस्मै नमः| याहून अधिक काय ?

कुंतल देशावर कुशलसेन नावाचा राजा राज्य करीत होता. एकदा दरबारात त्याने प्रश्न विचारला, शिक्षण कशासाठी हवं असतं? शिक्षणाची गरज काय? दरबारातील विद्वानांनी आपआपल्या परिने उत्तरं दिली. एक म्हणाला, शिक्षणामूळे मान मिळतो. “विद्या सर्वत्र पूज्यते |” दुसर्याने सांगितले, विद्येतून रोजगार उपलब्ध होतात. तिसर्याने उत्तर दिले, विद्येतूनच आपल्याला ह्या विश्वातील अनेक रहस्यं समजली. पंरतु राजाचं काही समाधान झाले नाही. मग दरबारातील एक विदूषक उभा राहिला, आणि म्हणाला, महाराज मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो, पंरतु माझी अट अशी आहे कि, उत्तर दिल्यानंतर आपण मला शिक्षा करणार नाहीत अशी हमी द्या. राजाने शिक्षा देणार नाही अशी हमी दिली. मग तो विदूषक म्हणाला, महाराज, असले फालतू प्रश्न कोणाच्याही मनात येऊ नये आणि आले तरी ते विचारून लोकांना सतावू नये. ह्यासाठीच शिक्षणाची गरज आहे. राजा निरूत्तर झाला. केवळ निरूत्तरच नव्हे तर जणू काही एखाद्या लढाईत पराभूत होऊन परतल्यावर जसा चेहरा होतो, तसा त्याचा चेहरा झाला होता. जवळजवळ पंधरा मिनिटभर दरबारात स्थब्धता पसरली होती. राजा भानावर आला, आणि लागलीच त्या विदूषकाला जवळ बोलावून शाबासकी दिली. मोठ्या मनाने विदूषकाचा गौरव केला. तेव्हा दरबारातील विद्वानांनी आणि सरदारांनी टाळ्या वाजविल्या. आता प्रश्न असा, कि राजाने विदूषकाचा गौरव करीपर्यंत दरबारातील विद्वान आणि सरदार गप्प का होते? खरं पाहता विदूषकाच्या उत्तराने राजा निरूत्तर झाला, तेव्हाच त्यांनी टाळ्या वाजवयाला हव्या होत्या. परंतु आपल्या राजाला दुखवावयाचं कसं ही भीती. ह्याचा अर्थ राजाची भाटगिरी करण्याची सवय जडली होती आणि तोच त्यांचा धर्म झाला होता. विदूषकाने दिलेल्या उत्तरामूळे “विद्येमूळे भीती नष्ट होते” ह्या शाश्वत सत्यावर शिक्कामोर्तब झाले. काळ बदलत गेला. राजेशाही नष्ट झाली. प्रजेच राज्य आले, तरीही राजापेक्षाही राजनिष्ठ असे विद्वान आजही पहावयास मिळतात. विशेषतः घराणेशाही लादणारे पक्ष जेव्हा सत्तेवर असतात, तेव्हा अशा प्रकारच्या विद्वानांची सारी मती, “आम्ही खरे निष्ठावंत” हे दाखविण्यात खर्ची पडते. असो.

आज शिक्षणाचं महत्व सर्वाना कळलं आहे. ज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. शिक्षणाच्या पारंपारिक शाखा म्हणजे, विज्ञान, कला,आणि वाणिज्य. ह्यांचा अगणित विस्तार झाला आहे आणि भरीस भर, रोज बदलत जाणारे तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी विषयांसंबंधीची नुसती यादी द्यावयाची म्हटलं तरी घाम येईल. सुदैवाने आज विद्येच्या विस्तारित जाणार्या शाखां संबंधीचं मार्गदर्शन करणार्या संस्था ही उपलब्ध आहेत. शिक्षणाची गरज काय, हा प्रश्न संपलाय. आपल्या पाल्यांनी दहावी वा बारावी नंतर कूठच्या शाखेत प्रवेश घ्यावयास हवा, ह्या प्रश्नाचं उत्तर आपली मूलंच शोधतात. आता मला पडलेला प्रश्न हा आहे कि कूठलं शिक्षण सर्वात मौल्यवान? आपण म्हणाल ,हा काय प्रश्न झाला? कूठलं शिक्षण मौल्यवान हे कसे ठरविणार? विद्येच्या जितक्या म्हणून शाखा आहेत,त्या सर्व मौल्यवान आहेत म्हणून कूठल्याही एका शाखेतील शिक्षण सर्वात मौल्यवान असं मानताच येत नाही. कूशलसेन राजाचा प्रश्न जसा कालबाह्य, तसाच हा प्रश्न ही कालबाह्य आहे. आपलं म्हणणं उचित आहे. पण जरासा विचार केला तर माझ्या प्रश्नाला उत्तर असावं, असे वाटते. आजचा काळ फार गतिमान आहे. रोज विज्ञान बदलत आहे. सर्वच क्षेत्रात जलदगतीने बदल होत आहेत. त्यामुळे आपल्यालाही बदलून घ्यावे लागतेच. ह्या बाबतीत कूणाच दूमत नसावे. आपल्या सार्यांच्या ह्या सहमतीतच, मौल्यवान शिक्षण कोणते,ह्या प्रश्नाचे उत्तर दडलयं. आपण शोध घेण्याचा प्रयत्न करू या.

एकदा एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना नायकाच्या गाडीला खोपोली येथे अपघात झाला. शूटिंग कोल्हापुरात होतं. राजवाडाचा सेट निर्माण केला होता आणि त्यासाठी संपूर्ण यूनिट पूर्ण तयारीत होतं. नायकाचा रोल भिकार्याचा होता. बहूतांश चित्रपटात नायक गरीब, दाखविलेला असतो. त्या शिवाय शेवट गोड कसा दाखविता येणार? असो, तर प्रसंग असा होता, कि त्या भिकार्याला राजाकडे कैफियत मांडायला प्रत्यक्ष राजाला भेटायचे होते. तो भिकारी दारू प्यालेला होता. व्यक्ती कोणीही असो, मद्याची कैफ असली कि त्याला कैफियती सूचतात. तो भिकारी नशेत राजमहालात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो आणि राजमहालाचा द्वारपाल प्रत्येक वेळी त्याला अडवितो. त्या झटापटीत तो जखमी होतो. इतक्या भागाचं शूटिंग करावयाचे होते. कोल्हापुरात शूटिंग स्थळी दिग्दर्शकाला नायकाच्या सेक्रेटरीचा फोन येतो आणि अपघाताची माहिती मिळते. चित्रपटातील नायकाच्या पायाला मार लागला आहे आणि चार दिवस खोपोली येथील रूग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत. फोनवरील बोलणं संपलं. मुंबई येथून संपूर्ण यूनिट पूर्ण तयारीनिशी आलेलं असताना, शूटिंग रद्द करणे परवरडणारं नव्हत. काय करावे ह्या चितेंत असतानाच रस्त्यावरून दोन इसम एकत्र जात होते, ते दिग्दर्शकांनी पाहिले. त्यातील एका इसमाची शरीरयष्टी नायकाच्या शरीरयष्टीशी जूळत होती. दिग्दर्शकाने त्या दोघांना बोलावून घेतले. ज्या इसमाची शरीरयष्टी आपल्या नायकाच्या शरीरयष्टीशी जूळत होती, त्याला भिकार्याचा रोल करण्याविषयी गळ घातली. त्याला प्रसंग समाजावून दिला. तो इसम क्षणार्धात तयार ही झाला. त्याला मेकअप रूममध्ये नेऊन जरूरीप्रमाणे मेकअप करून घेतला. आता प्रत्यक्ष शूटिंग सूरू झालं. भिकार्याची मद्याच्या झिंगेतून द्वारपालाशी हूज्जत सूरू झाली. द्वारपालानी त्याला लोटले. पून्हा ऊठून तो राजमहालात जाण्याचा प्रयत्न करतो, यावेळी द्वारपालाने त्याला जोरात मागे लोटले. तो पून्हा कसाबसा उठत पून्हा हूज्जत घालीत राजमहालात जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा द्वारपालाला प्रचंड राग येतो आणि भिकार्याला लाथ मारून तूडवतो. भिकारी दोन फूटांवर उताणा पडून त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागले. Scene ओके झाला आणि तो ही retake न करता. यूनिटमधील सर्वांनी जोरजोरात टाळ्या वाजवून त्या भिकार्याचा जयघोष केला. त्याला आपल्या हाताचा आधार देत स्वतः दिग्दर्शकांनी उठविले आणि त्याच्या पाठीवर शाब्बासकी दिली. त्या इसमाचं मेकअप काढून त्याच्या जखमेवर जरूरी मलमपट्टी केली. नायकाच्या गैरहजेरीत शूटिंग पूर्ण झाल्यामूळे संभावित आर्थिक नूकसान टळलं. मनस्ताप टळला. वेळ वाचला आणि त्यातही नायकाची भूमिका करणार्या अनोळखी इसमाने रिटेक न करता शूटिंग पूर्ण केलं. त्यामुळे दिग्दर्शक महाशय फार खुषीत होते. चहापानाच्या वेळी दिग्दर्शक आपल्या सर्व स्टाफ च्या देखत त्या इसमाचं कौतुक करताना म्हणाले, “महाशय, आपण आज जो अभिनय केला,तो आमच्या ह्या सिनेमातील नायकाच्या तोडीचा आहे. त्यामुळे तुमचे आम्हांवर फार उपकार झाले. आहेत. Hats Off To You”. दिग्दर्शकांनी त्याला विचारले, “महाशय, आपण या पूर्वी कधी अभिनय केला आहे कां? आपल्याला अभिनयाचा अनुभव आहे कां? तूम्ही फारच सूदंर रित्या अभिनय केला”. त्या इसमाने उत्तर दिले, “सर, तसा काही अनुभव नाही. मी शाळा-काॅलेजमधील गॅदरींगमध्येही कधी भाग घेतला नाही”. दिग्दर्शकांनी विचारले, ” By the way, तूम्ही करता काय?, I mean your profession?” त्याने शांतपणे उत्तर दिले, “मी Lic चा एजंट आहे. आम्ही संयम शिकलो आहोत. आम्हाला दरवाज्यावरून प्रत्यक्ष असे ढकललेले नसले, तरी विम्यासाठी नकारघंटा फार वेळा अनुभवली आहे”. दिग्दर्शकांने स्वतः त्या एजंट कडून विम्याची पाॅलीसी घेण्याचे ठोस आश्वासन दिले आणि अधूनमधून सिनेमात छोटे छोटे रोल देईन असं ही सागिंतले.

वरील उदाहरणवरून मौल्यवान शिक्षण कोणते, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे. काय बरं उत्तर असेल?विद्याच्या कोणत्या शाखेतील शिक्षण सर्वात मौल्यवान आहे? Are you still guessing? उत्तर एका साहित्यिकाच्या (बहुधा बेन्जामिन फ्रॅन्क्लीन) मूखातून ऐकू या. “The best valuable of all the education is to make yourself to do a job which u have to do and when it is ought to be done, whether you like it or not”. “आपल्याला जेव्हा एखादं काम पार पाडायचं आहे, आणि ते आपल्या हातूनच व्हावे अशी नियतीची इच्छा असेल तर ते काम वा जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण पूर्णपणे त्या कामात झोकून घ्यावे. आपल्याला ते काम वा जबाबदारी आवडो वा ना आवडो, हेच खरे मौल्यवान शिक्षण आहे”.

मंडळी, आजच्या काळात आपल्याला आवडणारं काम मिळेलच ह्याची शाश्वती नाही, आणि मिळालं तरी आपण ज्या पध्दतीने ते काम करतो, ती पद्धत बदललेली असू शकते. तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. त्या बदलाला सामोरे जाण्यासाठी तयारी करणे आवश्यक होत आहे. क्षेत्र कूठलेही असो, काळाबरोबर चालण्याची वा धावण्याची कला आत्मसात करणे हीच बाब महत्वाची होत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विख्यात तज्ञ, लेखक, अर्थतज्ञ, आणि सार्या मराठी समाजाला ज्यांचा अभिमान वाटतो असे अष्टपैलू व्यक्तीमत्व अच्युत गोडबोले ह्यांचा कळकळीचा आणि मोलाचा सल्ला आहे “सतत बदला, नाहितर नष्ट व्हा”.

Leave a Reply

Your email address will not be published.

You May Also Like

চিত্রাঙ্গদা – Chitrangada

পান্ডব রাজপুত্র অর্জুন একসময় পূর্ব ভারতের ঘন বনে ঘুরে বেড়াচ্ছিলেন। তিনি এমন…

आज भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका, लावण्यवती मा.अंजनीबाई मालपेकर यांची पुण्यतिथी.

संजीव वेलणकर मा.अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. मा. अंजनीबाई मालपेकर…

अप्रृप

सवयी प्रमाणे कलिंगड व्यवस्थित कापून फ्रीज मध्ये ठेवून दरवाजा बंद करताना पदर…

गर्विष्ठ राजकन्या

कलिंग देशाच्या राजाची मुलगी मैनावती फार सुंदर होती. आपल्या सौंदर्याचा तिला फार…