Rod Maratha

मराठी च्या खुणा जपणाऱ्या रोड मराठा बांधवांची आज देशाच्या इतिहासात ओळख ठळक झाली आहे ती नीरज चोप्रा या मूळे.नीरज चोप्रा हा प्रथम भारतीय आहे नंतर मराठी आहे असा सल्ला अनेक जण देत असेल तरी त्यामुळे रोड मराठा साठी उत्सुकता देश भारत जागी झाली आहे.खेळाडूची जात पात आणणे खूप चुकीचे आहे याची जाणीव आहे. पी सिंधू हे जेंव्हा प्रसिद्ध झाली तेंव्हा तिची जात कोणती याची सर्वात जास्त चौकशी गूगल वर झालेली, काळ नीरज चोप्रा ने सुवर्ण पद जिनके तेंव्हा अचानक तो रोड मराठा आहे याचा सर्व ठिकाणी viral होऊ लागले

प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे रोड मराठ्यांबद्दल वेगळा इतिहास सांगतात.पानिपताच्या तिसऱ्या युद्धानंतर दहा वर्षांनी महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा केला होता. त्यावेळी त्यांनी पानिपत, सोनिपत, बागपत अशा परिसरावरही कब्जा मिळवला होता. मराठा सैन्य इथं राज्य करत होतं. १८००च्या नंतर मराठ्यांची सत्ता उत्तर भारतात कमकूवत व्हायला लागली. त्यानंतरही काही मराठा सैनिकांनी तिथंच राहण्याचा निर्णय घेतला. त्या सैनिकांचेच वंशज हे रोड मराठा म्हणून ओळखले जातात,” असं ते म्हणाले.

याबाबत बोलताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे म्हणाले, ‘पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठे देशाच्या रक्षणासाठी लढाईसाठी गेले होते. त्यांना काही अडचणींमुळे पराभव पत्करावा लागला होता. मात्र, तेव्हा युद्धाचे उद्देश जिंकले.पुढे अनेक वर्षे मराठ्यांनी देशावर सत्ता गाजवली. पानिपतच्या युद्धात हरल्यानंतर एक टोळी जंगलात लपून बसली होती. ते गावात येताना त्यांनी मराठा ही ओळख सांगितली नाही कारण त्यांना धोका होता. त्यांनी रोड समाजाचे असल्याचे सांगितले.

पुढे त्यांच्याकडे प्रत्येक गावाच्या संरक्षणाची जबाबदारी या समाजाकडे आले. आज हरियाणातील १९ टक्के जमिनी रोड मराठ्यांकडे आहेत. या समाजाची मुले प्रामुख्याने सैन्यात आहेत. आता ते मराठा लाइट इन्फट्रीत आहेत. हरियाणातील आयएएस अधिकारी वीरेंद्र मराठा वर्मा यांनी या जातीचा शोध घेतला.या समाजातील लोक शिंकताना ‘छत्रपती की जय’ असे म्हणत. हा एक धागा पकडून त्यांनी संशोधन केले. त्यानंतर आम्ही प्रचंड शोध घेतला. कुंजीपुरा येथे २०० भोसले आहेत. तेथे चोपडे आडनावाचे लोक आहेत त्यांना चोपडा, पाटील यांना पटेल असे अपभ्रंश करून शब्द वापरले गेले.रोड

मराठा समाजाच्या बोलीमधील अनेक शब्द हे मराठी आहेत. उदाहरणात ते फेट्याला फटका म्हणतात. याशिवाय कवाड, लाड्डू, म्हैस, ससा, कधी, थांबले, दुपार, कुचेष्टा, माहिती, रामराम, जाता, गोधडी, काठी, परात, पाहुणा, धार काढणे असे अनेक शब्द त्यांच्या बोलीत आहेत.विवाहातील प्रथाही महाराष्ट्रातील प्रथा यांच्यात साधर्म्य आहे. विशेष समारंभात ते पुरणपोळी केली जाते. इथं सामूहिक जेवणाला भंडारा असा शब्द आहे.

“1761च्या युद्धानंतर मराठे महाराष्ट्रात परतले. त्यातील जवळपास 250 कुटुंबं कुरुक्षेत्र आणि करनालच्या जंगलात मागे राहिली. जर कुणी त्यांना त्यांची ओळख विचारली तर ते राजा रोडची ओळख सांगायचे. हीच ओळख पुढं कायम राहिली. नंतरच्या काळात पुढच्या पिढ्या त्यांची मूळ ओळख विसरून गेले,” नफेसिंग सांगतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

You May Also Like

आज भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका, लावण्यवती मा.अंजनीबाई मालपेकर यांची पुण्यतिथी.

संजीव वेलणकर मा.अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. मा. अंजनीबाई मालपेकर…

अप्रृप

सवयी प्रमाणे कलिंगड व्यवस्थित कापून फ्रीज मध्ये ठेवून दरवाजा बंद करताना पदर…

गर्विष्ठ राजकन्या

कलिंग देशाच्या राजाची मुलगी मैनावती फार सुंदर होती. आपल्या सौंदर्याचा तिला फार…

‘ध’चा ‘मा’ घडल्यानंतरच्या कांडात बळी गेलेले नारायणराव पेशव्यांचा आज जन्मदिन

बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांना दोन मुले. थोरला बाजीराव व धाकटा चिमाजी. बाळाजी…