कलिंग देशाच्या राजाची मुलगी मैनावती फार सुंदर होती. आपल्या सौंदर्याचा तिला फार गर्व होता. ती उपवर झाल्यावर तिच्या त्यासाठी तिचा पिता बर संशोधन करूं लागला. त्याने तिच्या योग्य राजकुमारांची चित्रे मागवून तिला दाखविली. परंतु तिला त्यांतील एक सुद्धा पसंत पडला नाही. शेवटी राजाने एका शुभ मुहूर्तावर तिचे स्वयंवर ठेवलें. देशोदेशीचे राजकुमार राजाच्या निमंत्रणाला मान देऊन ठरल्या दिवशी तेथे जमले. स्वयंवर मंडप खचाखच भरला होता.

मैनावती हातांत वरमाला घेऊन आली. सर्वजण उत्सुकतेने तिच्याकडे पाहात होते. हळू हळू ती एकेकाला पाहात तिघाली. प्रत्येकाला पाहून त्याला काही नावे ठेवून ती पुढे जाई. कोणाला लछु, कोणाला शेळपट, कोणाला चेंडू, कोणाला बावळट, कोणाला काळा वगैरे म्हणून ती निघून गेली.

सर्वात शेवटीं एक राजकुमार बसला होता तो फार सुंदर व तेजस्वी होता. परंतु मैनावतीच्या गर्वाने भरलेल्या डोळ्याला ते दिसले नाही. त्याला नाव ठेवायला काहीच जागा नव्हती. म्हणून तिने त्याला “मिशावाला मेंढा” म्हणून नाकारले. स्वयंवर संपलें. सगळे निमंत्रित मंडळी आपापल्या घरी निघून गेली. मैनावतीने कोणास हि पसंत केले नाही. त्यामुळे राजा काळजीत पडला की आता काय करावे. काही दिवस गेले.

एक दिवस राजाने मैनावतीला बोलाविले आणि म्हणाला

“तुला आपल्या रूपाचा फार माद चढलेला दिसतो आहे. इतके राजकुमार आले. त्यातील एकाला सुद्धां तूं पसंत केलें नाहीस?”

“काय एक सुद्धा तुझ्या योग्य नव्हता.. उद्या सकाळी जो कोणी भिक्षेकरी किंवा गायक राजवाड्याच्या दाराशी प्रथम येईल त्याला मी कन्यादान करून मोकळा होईन.”

मैनावती घाबरली. आता तिला काही बोलावयाला तोड नव्हते. दुसरे दिवशी सकाळी अगदी पाहाटे एक भिकारी राजवाडयाजवळ येऊन गाणे म्हणू लागला. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते. त्याची दाढी वाढलेली होती. कित्येक दिवस अंघोळ केली नसल्याने त्याचे अंग गलिच्छ वाटत होते.

राजाने प्रथमच घरांत एकादें काम मिळाले तर पाहातो. तिच्या नवऱ्याने सहानुभूति दाखवीत म्हटले. तिला हे काम तर जास्तच अपमानकारक वाटले. पण तिला ते काम करावे लागले. तेथे दिवसभर काम करून रात्री घरी येतांना आपल्या नवऱ्यासाठी ती थोडेंसें बांधून आणीत असे. साधारण आठ दहा दिवस गेले असतील, तिला नोकरांचाकरांच्या तोंडी कळले की राजाचे भय आहे. पण कोणाशी केव्हां हे कांहीं कोणाला नीटसे माहीत नव्हते. मैनावती मनातल्या मनांत फार दुःखी झाली. नित्य नियमाप्रमाणे कामधाम संपवून ती घरी जाण्यास निघाली. पण वाटेंत स्वयंपाकी म्हणाला

“आज आंगण किती छान सजवल आहे…! पाहा तरी…!”

ती नाखुशीनेंच ते पाहावयास गेली. त्याच वेळी मिशिदार मेंढा राजा स्वयंपाक्यावर ओरडला,

“कोण आहे रे ती, अशी डोकावून डोकावून काय पाहाते आहे. तिला म्हणावं त्यापेक्षा एकादें नृत्यच करून दाखव.”

राजाची आशा अमान्य करून कशी चालेल. तिने हळूच अंगणांत पाय टाकला. राजाच्या इशाऱ्याने वाद्ये बाजू लागली. मैनावतीला नृत्यकला अवगत होती. म्हणून इच्छा नसतांना सुद्धा तिची पावलें तालावर नाचू लागली. नाच करता करता तिच्या ओट्यात बांधलेले अन्न खाली पड़लें, ते पाहून सर्व हंसू लागले. मैनावती खजील झाली. तिचा गर्व आत्ता पर्यंत अगदी पार विरून गेला होता.

लाजेने ती थबकली, तोच राजा पुढे आला व तिचा हात धरून आपल्या महालांत घेऊन गेला. तेथे तिला म्हणाला

“मी मिशाळ मेंढा आहे. मला नीट ओळख. बघ दाढीवाला भिकारी पण मीच आहे. आणि तो आडदांड घोडेस्वार हि दुसरा तिसरा कोणी नव्हता. पटते का ओळख..! तुझ्या वडिलांनी तुला मला देण्याचेच ठरवून तसे केले. तुझा अहंकार, घालविण्यासाठीच मला भिकाऱ्याचा वेश घेऊन राहावे लागले. बरें..! झालं गेलें तें आतां विसरून जाऊन सुखाने राहा. तुला दुःख करण्यासारखें यात काहीच राहिलेले नाही.”

मैनावतीने आपल्या नवऱ्याला ओळखून पश्चाताप व्यक्त केला. त्याची क्षमा मागितली. आणि तेव्हा पासून ती सुखाने राहू लागली.

तिने आपला संसार विशेष काळजी घेऊन दक्षतेने केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

You May Also Like

চিত্রাঙ্গদা – Chitrangada

পান্ডব রাজপুত্র অর্জুন একসময় পূর্ব ভারতের ঘন বনে ঘুরে বেড়াচ্ছিলেন। তিনি এমন…

आज भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका, लावण्यवती मा.अंजनीबाई मालपेकर यांची पुण्यतिथी.

संजीव वेलणकर मा.अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. मा. अंजनीबाई मालपेकर…

अप्रृप

सवयी प्रमाणे कलिंगड व्यवस्थित कापून फ्रीज मध्ये ठेवून दरवाजा बंद करताना पदर…