हजारो किराणा दुकांदारांना वाटत असेल की आजपासून ते त्यांच्या शॉपवर वाइन सुद्धा विकायला ठेऊ शकणार आहे तर थांबा. तस अजिबात नाहीय. सरकारचा यातला उद्देश ना ही तुमच्या धंद्याची भरभराट व्हावी हा आहे ना ही या संकल्पनेतून वाइन विक्रीचा खप राज्यात वाढावा हा आहे. सरकारला कितीही म्हणू देत वाइन हे एक मद्य नाही परंतु मद्य नाही तर मग याच्या विक्रीसाठी परवान्याची गरजच नसती. तर होय तुमच्या दुकानात तुम्हाला ही वाइन विक्रीसाठी ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन आधी वाइन विक्रीसाठीचा रीतसर परवाना घ्यायचा आहे. या परवान्याच तुम्हाला दरवर्षी नूतनीकरण सुद्धा करावे लागणार आहे. आणि हीच खरी सरकारची कमाई आहे. हजारो किराणा शॉप्स आणि मॉल्स आपल्या राज्यात आहेत. विचार करा केवळ एक लाख रुपये जरी परवाना शुल्क ठेवले तरी केवढी मोठी ही रक्कम होईल. ही झाली सरकारच्या उत्पनाची पहिली बाजू. आता दुसरी बाजू म्हणजे ही वाइन खरेदी तुम्हाला करायचीय आणि विक्री सुद्धा तुम्हालाच करायची आहे तरीसुद्धा तुम्ही जेव्हा calculate करून बघाल तेव्हा तुमच्या अस लक्षात येईल की या धंद्यापासूनच्या मिळणाऱ्या नफ्याचा सगळ्यात मोठा भागीदार तर सरकार आहे. हे अगदी पेट्रोल डिझेल प्रमाणेच आहे. क्रूड ऑइल रिफायनरीज किंवा मग पेट्रोल पंप धारकांच्या पेक्षा कितीतरी अधिक नफा हे यावर टॅक्स लावणार सरकार घेत असते. तुम्ही ज्यावेळी लिटर मागे पाच रुपये कमविता त्याच वेळी ते लिटर मागे पन्नास रुपये कमवित असतात.
वाइन किराणा दुकानात ठेवल्याने आणखी दोन नुकसान असे होऊ शकतात की ज्या दुकानात ग्राहकांची सतत वर्दळ नसते अशा दुकानदारांना त्याच्या दुकानात नशा आणणारा हा एकमेव पदार्थ असल्याने दुकानदारालाच याच व्यसन जडु शकते. आणि दुसरी गोष्ट आजही किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी ही महिला ग्राहकांची असते. त्यांना वाइन खरेदी साठी येणाऱ्या बेवड्या लोकांच्या नजरेचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांचं तुमच्या दुकानात खरेदीसाठी येण्याच प्रमाण यातून घटू शकते आणि यातून तुमच्या व्यवसायावर त्याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो.
शंभर दीडशे मिलिलीटर वाइन पिल्याने फार काही होत नाही. एवढी वाइन अपेटायझरच काम करते परंतु याचे शौकिन (आपल्या देशातील) हे पिण्याच प्रमाण जोवर झिंग येत नाही तोवर वाढवत राहतात आणि पुढं हेही एक व्यसन होऊन जातं.
आजची तरुण मुलांची पिढी ज्यावेळी आपल्या कॉलेज महिला मित्रांच्या सोबत पिकनिक वैगरे साठी जाते त्यावेळी स्वतः हार्ड ड्रिंक घेतांना याच मुलींना वाइन सॉफ्ट ड्रिंक आहे म्हणून ती प्यायला प्रवृत्त करते. आता धोका असा असेल भविष्यात की वाइनची एकप्रकारे मुलींना सवय लागून जाईल. विशेषतः घरापासून दूर शिक्षण घेत असलेल्या , हॉस्टेल जीवन जगत असलेल्या मुली. या पुढं या मुली तुम्हाला बिनधास्तपणे किराणा आणि शॉपिंग मॉल्सवर वाइन घेतांना दिसू लागलेल्या असतील.
सरकारी उत्पन्न वाढवायच्या नादात हे सरकार भावी पिढीच्या जीवाशी खेळतय. आधीच या डिजिटल क्रांती मुळे मुलांच्या क्रयशक्तीचा प्रचंड ह्रास झालेला आहे, होतोय. आता त्यातच मुलांना बिनधास्त नशा करण्याची मुभा सुद्धा या उपक्रमातून ह्या सरकारने देण्याचा घाट घातलाय.
लेखक, संकलक अज्ञात!

Leave a Reply

Your email address will not be published.

You May Also Like

Indian students should avoid going to USA for higher education. Here are 5 reasons.

In USA University education is extremely vast and much less regulated. Universities…

Rajat from India and Muhammad from Pakistan arrive in USA on F1 Visa. You will be surprised to know what happens next.

In year 2012 Rajat from India and Muhammad from Pakistan arrived to…

BlackHistoryMonth and USCIS’s systemic racism against Indians

I believe in the American dream, and working at USCIS allows me…

Senator Bob Menendez’s lies on immigration hurts hispanic immigrants

Indian immigrant community has often pointed out that Senator Dick Durbin of…